Author Topic: शाप..  (Read 1034 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शाप..
« on: October 24, 2012, 03:01:17 AM »
एक तर मी पडलो प्रेम कवी. त्यामुळे रद्दीवाल्याकडे जसे सगळे पेपर हमखास येतात तसेच माझे बरेचसे मित्रही माझ्यापाशी ह्या विषयाची रद्दी घेऊन येतात. त्यांचे अनुभव सांगतात. हृदयापासून आलेले असल्यामुळे बरेचशे worth listening असतात. काही तुम्ही कुठे चुकताय हे दाखवणारे असतात. काही पुढच्याला ठेस मागचा शहाणा ह्या धाटणीचे असतात. पण का कुणास ठाऊक. माझ्यापाशी आजवर आलेला एकही प्रेमात यशस्वी नाही.. आणि ह्यात माझा दोष नाही.!!
तर बहुतांश लोकांचा प्रॉब्लेम हा कि त्यांना मुलींचा स्वभावच समजत नाही. तिच्या मनात नेमकं काय आहे हे जाणण्यासाठी पोरं मनस्ताप करून घेतात. तिच्या वागण्याचं कारण हे एखाद्या अवगड गणितापेक्षाही अवघड वाटतं त्यांना. खरं आहे ते. बाकीचे ताप खूप असले तरी मुली मनमौजी असतात.
एका जवळच्या मैत्रीणीनं केलेला उलगडा असा कि मुली एकट्या कधीच नसतात. त्यांना नको इतकं प्रेम मिळणारच असतं. मिळतंच जातं. त्यांना नको असताना सुद्धा!
मग त्या सरावतात असल्या वातावरणात आणि मग बिनधास्त बनून जातात. मग हा मनमौजीपणा त्यांची हत्त्यारं आणि आपल्यावरचे वार बनून जातात.
पोरं पडली साधी भोळी. त्यांना कोणीच जवळ करत नाही. पोरीनं दाखवलेल्या टिकलीएवढ्या ओलाव्यात त्यांना जिव्हाळा दिसू लागतो. आणि मग पोरी टारटूर करायलाच बसलेल्या असतात. चूक कुणाचीच नाही!!
माझं पोरांना एकच सांगणं (आणि स्वत:लाही!) कि खरं प्रेम करणं, होणं ह्या गोष्टी गोष्टीतच राहिल्यात आता.
तुम्हाला वाटेल pesimistic  आणि अजून काही काही. आपलं नशिब आजमावून या मग बोलू.
सगळं सगळं सगळं infatuation आहे आज. फक्त infatuation! अगणित प्रेम कविता, अगणित चारोळ्या केलेला.. स्वभावाचे सरकत जाणारे पैलू डोळे उघडे ठेऊन पाहिलेला माणूस आहे मी. महिनाभर लांब राहा अगदी तना मना धनाने.. विसरताल तुम्ही!! अगदी ९९ % लोकांना लागू होईल हे.
ह्या गोष्टींना आयुष्यात स्थान एका timepass पेक्षा जास्त देऊ नका. पोरांनो खास तुमच्यासाठी.
त्या दिवशी मी तिथं होतो हे ऐकायला. अहोभाग्य माझं. गणपतीचे दिवस होते. आणि आमचे आवडते सर काही सांगत होते. म्हटलं तर महत्वाचं. म्हटलं तर काहीच नाही. बोलत होते अगदी मनापासून असं काही. "हि जी ढोल वाजवणारी मुलं असतात मिरवणुकीत, कशासाठी रे ढोल वाजवतात हि पोरं? पोरींवर impression च पाडायचं असतं ना?! हो तेच तर कारण असतं.. ह्या मिरवणुकात डोळ्यातल्या डोळ्यात किती कहाण्या घडून जात असतील. कुणा मुलीला त्याचं ढोल वाजवणं आवडून जात असेल. तर कुणा मुलाला तिची नववारी साडी आवडून जात असेल. पण पुढच्या क्षणाचं काय.. ती कहाणी एका चौकातल्या वळणावरच संपते! इतकी क्षणभंगुर अशी ही कहाणी. आणि समजा झालंच जर लग्न त्या दोघांचं तर उद्या मुलाच्या admission ला पैसे नसतील तर भांडताना तिला तुमचं ढोल वाजवणं आठवणार नाही. आणि वैतागून मनात चरफडताना तुम्हालाही तिची नववारी साडी आठवणार नाही. किती क्षणभंगुर असतं ना हे सगळं.
तुम्ही दिवसभर किती खपला याला काहीच महत्व नसतं. At the end of the day, what matters is the money. फक्त पैसा!! कटू सत्य आहे पोरांनो पण जितकं लवकर समजताल तेवढं चांगलं आहे"..
काहीतरी ठरवा. पाहिजे तेवढा वेळ घ्या. हे आयुष्य खूप मोठं आहे. पण ठरवलेल्या ध्यासाशी एकनिष्ठ राहा.
ध्येय वेडे व्हा. पोरींच्या मागे धावते मन हा निसर्गाचा शाप आहे. तुम्ही ध्येयाकडे divert करा त्याला. मुली तुमच्या मागे असतील. अगदी १००% ;)

- रोहित
« Last Edit: October 25, 2012, 12:44:56 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता