Author Topic: एक और बात..  (Read 1719 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
एक और बात..
« on: November 13, 2012, 12:43:25 AM »
 मी आणि माझा एक मित्र.. एखाद्या शनिवारी, रविवारी बोलायला बसलो कि काय आनंद असतो देव जाणे. पण आठवडाभर त्रासलेली गणिते जुळवायचा कार्यक्रम होऊन जातो. एखाद्या विषयाच्या मुळात जाऊन problem solve करू पाहणारी समीकरणे काढू पाहतो.. बऱ्याचदा बरोबर असणारी. फार थोड्या वेळेला फसणारी.
हि खलबते चालतात रात्री ११ च्या पुढेच. सगळं  काही सामसूम असताना. मुळात असल्या गप्पांना रात्रच हवी. दिवसा ह्या गप्पांवर बोलायला कुणाला वेळ नसतो अन मूडही. मग अश्या रात्रीच्या वेळी फिलोसोफ्या बाहेर येतात. प्रेम प्रकरणे रंगतात. ती अशीच वागते. तसंच करते. मग तू एक काम कर. ह्या वेळेला तू असंच कर. आयच्या गावात मग बघ.. रंगत जाणारी चर्चा रंगतच जाते. सिगारेटी शिलगावल्या जातात. प्रचंड टेन्शन असल्यासारख्या सुरात धूर हवेत विरतच राहतो. जो ऐकतो त्याच्या ऐकण्याच्या इंटरेस्टचा जास्त प्रश्न नसतो. सांगणाऱ्याला ऐकणारयाचा हवा असतो कान. आणि थोडी सहानुभूती..
इथे जुळणारी नाती थोडी गहीरीच असतात.., दिवसभर फसलेल्या नात्यांपेक्षा..!! एका हाकेवर गरजेला धावणारे बरेचसे मित्र असेच बनतात.
चांदण्यात नेहमीच्या ठरलेल्या कट्ट्यावर जमताना, थोडे त्याचे चटके शेअर करताना, थोडे आपले सांगण्यात जी मजा असते; भलेही उद्याच्या practical जगात ते फंडे लागू होईलच याची शाश्वती नाही पण तो relief कुठेतरी मनाच्या कप्प्यात पाणी शिंपडत राहतो.
त्याची जमीन कितीही तापत राहिली तरी..!   

- रोहित
« Last Edit: November 13, 2012, 12:53:41 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता