Author Topic: What is प्रेम लव ?  (Read 3734 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
What is प्रेम लव ?
« on: November 25, 2009, 09:52:27 AM »
प्रेम लव या शब्दांमधेच जादु आहे ना? अगदी सगळ्यांना भुरळ पाडणारी. प्रेत्येक तरुण तरुणींच स्वप्न आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तो आपण शोधावा म्हणजे आपल लव मॅरेज व्हाव.. एक गोड स्वप्न. चित्रपटां मधुन दाखवतात तस गाणी गुणगुणायला लावणार काहीतरी थ्रील असलेल आपण करतोय, आमिर खानच्या पहला नशा या गाण्यासारख तरंगत ठेवणार.

शाळेतल्या काही नववी दहावी च्या मुलांच्या तोंडी सुध्दा असत तर माझ किनी त्या मुलीवर प्रेम आहे...प्रेम म्हणजे काय नक्की कळालेलही नसत त्या वयात प्रेम सुध्दा होत, हसु आल ना.. गंमत नाही वस्तुस्थिती आहे. कॉलेज मधे तर तारुण्याचा नुसता सळसळता उत्साह एखादी मुलगी नुसती आवडायचा अवकाश लगेच तिच्यावर प्रेम जडते अगदी love at first sight हीच ती जिच्या मी शोधात होतो आणि मग तिच चिंतन सुरु आभ्यास नको, करीयर नको ते काय रे नंतर करता येइल... फ़क्त तिने मला हो म्हणाव... काय कमी आहे माझ्यात... ती अशी का करते? नाही का म्हणते?..... तु हा कर या ना कर तु है मेरी... हिरोंचे आदर्श आहेतच समोर. या सगळ्या भुलभुलय्यात वेळ आणि वय कस भुरकन निघुन जात. मुलगी नाही करीयर नाही. अगदी दहावी बारावीत बोर्डात आलेले सुध्दा या मोहजालात फ़सतात.

नाहीतर काही जणांना ती हो म्हणते मग सुरु होत अफ़ेअर गुपचुप भेटण्यातली गोडी जरा जास्तच रंगत आणते... शेवट गोड झाला तर लग्न होते, विरोध झाला तर जास्तच प्रेमाला धार येते, मग पळुन जाउन लग्न अजुनच थ्रील... तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अन्जाना.... बर्याचदा हे अन्जाना बंधन शारिरीक आकर्षण असत ते नव्याचे नऊ दिवस सरल्यावरच कळत पण तो पर्यन्त बराच लेट होतो. आधी किती कौतुक असत आपल लव्ह मॅरेज आहे हे सांगायला, अगदी स्वताला नशीबवान म्हणत असतो पण खटके उडायला लागले कि वाटत कुठे डोक गाहाण ठेवल होत प्रेम करताना कुठे बोलायची सोय नाही राहीली. खरच सोय राहीलेली नसते आपलेच दात आणि आपलेच ओठ.

मग काय प्रेम वगैरे सब झुठ का? का ते फ़क्त चित्रपटात दाखवतात ते खोट खोट भातुकलीच्या खेळासारख, खर प्रेम आहे का नाही जगात? हो आहे ना नक्कीच आहे पण खर प्रेम जाणुन घ्यायचा प्रयत्न किती जण करतात? शारीरीक आकर्षण हे एका मृगजळासारखे असते त्याच्या पाठीमागे धावुन नाहक दमछाक मात्र होते. एखादी व्यक्ती आवडण म्हणजे प्रेम होत का? प्रेमात पडायला फ़क्त आवडण पुरेस आहे का? चित्रपट तुम्हाला स्वप्न विकतात. प्रेमाच स्वप्न बघायला कोणाला आवडणार नाही पण स्वप्नात आणि वास्तवात फ़रक असतो हेच लक्षात घेतल जात नाही.

प्रेम हे सहवासाने निर्माण होते.प्रेम होण्यासाठी ती व्यक्ती आवडण तर जरुरी आहेच पण त्या ही पेक्षा गरज आहे त्या व्यक्तीला आपण पुर्ण ओळखण, त्याच्या गुणांइतकच दोषांसकट ती आवडण, त्याच्या स्वभावातल्या खाचाखोचा कळण आणि आपलेही प्रॉब्लेम्सची, गुणावगुणांची माहीती असण आणि त्याला ती व्यक्ती ऍडजस्ट होइल अशी खात्री, विश्वास म्हणजे प्रेम. नुसत तुम्हाला प्रेम वाटुन उपयोग नाही त्या ही व्यक्तीला तितक्याच ऊत्कटतेने तुमच्याबद्दल वाटते का? हे बघणही जरुरी आहे नाहीतर ते एक तर्फ़ीच होइल.


आजकाल लव मेरेज करणार्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्याचप्रमाणात घटस्फ़ोटांची सुध्दा. कारण प्रेम म्हणजे शारीरीक आकर्षण हेच समीकरण बर्याचदा असत. कुणीतरी आपल्यावर प्रेम करणार असाव यात आपल्याला समजुन घेणार असाव हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामानाने ऍरेन्जमॅरेज बरेच यशस्वी होतात कारण त्यात थोड ऍडजस्टमेन्ट करायची मानसिक तयारी असते, तेवढा वेळ द्यायची तयारी असते.

आजकाल चित्रपटात आणि मालिकांमधे जास्ती करुन आढळणारा विषय म्हणजे ex-marital affair . त्यांना फ़क्त जे विकत घेतल जात तेच बनवायच असत आणि विकायच असत, बाकी आपण जे दाखवतो त्याचा जनमानसा वर काय परिणाम होतोय याच्याशी त्यांना काडीच देणघेण नसत. होउ घातलेल्या हिरोंची प्रतिमा लग्नानंतर सुद्धा परत प्रेमात पडणार्याची, त्यात पण काहीतरी थ्रील. पण एव्हाना बरीच मॅच्युरीटी आलेली असते त्यामुळे सगळेजण त्या वाटेला जात नाहीत पण जर मॅच्युरीटी कमी पडली, जबाबदार्यांपेक्षा त्या थ्रील मधे गोडी वाटली तर ती व्यक्ती स्वताबरोबर बरोबरच्या लोकांच आयुष्य बरबाद करते. लग्नाआधी अफ़ेअर हा मॅच्युरीटी नसतानाचा केलेला येडेपणा म्हणुन सोडुन देता येइल पण लग्नानंतर या गोष्टी फ़ारच सिरीयस होतात.

आता चित्रपटातल बघुन कोणी असे उद्योग करेल का? एक दुजे के लिये रिलीज झाला तेव्हा आत्महत्या करणार्या युगुलांच प्रमाण वाढल होतच. ते कशाला डर सारख्या चित्रपटामुळे तरुण मुलांच मुलींना त्रास देण्याच प्रमाण वाढल होत, त्या हिरोगीरीतच धन्य मानण्याच. किती प्रमाणात चित्रपट आपल्या टीनएजर्स वर प्रभाव टाकु शकतात हे इथेच कळते. मग जे दाखवतात तेच खर अस मानल तर त्यांच तरी चुकल कुठ? स्मिता तळवलकरच्या सातच्या आत घरात या चित्रपटात वास्तवाच रियलाइज झालेले तरुण तरुणी फ़ार छान दाखवले आहेत. हे माझ आयुष्य आहे मला मी पाहिजे ते करेल हे चित्रपटातच शोभणारी वाक्य आहेत हे कळेपर्यन्त बरच पाणि पुलाखालुन गेलेले असते.

आपल्याकडची शहरातली संस्कृती ही पाश्चात्यांच्या वळणावर जाउ पाहातेय कदाचित थोडी फ़ार गेलीही आहे म्हणा त्यांना हे ठाउक नाही कि हीच संस्कृती एक असुरक्षितता पण घेउन येतीये. एक इन्सेक्युरिटी जी आपल्या लाइफ़ पार्टनरची गॅरेन्टी न वाटणारी, परस्परांमधला विश्वास कमी करणारी. गरज आहे आपल्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची. प्रेम आणि आकर्षण यातील सीमारेषा सांगण्याची. त्यांना दुरदृष्टीने त्यावर विचार करायला लावण्याची. त्यासाठी आइवडिलांचे मुलांशी मैत्रीपुर्ण संबंध असायला पाहिजेत. विरोधाला विरोध न करता त्यांच्या कलाने त्यांना समजाउन सांगण्याची जास्त गरज आहे. आणि स्वता तरुणांनी यावर विचार करुन नक्की प्रेमाचा अर्थ शोधण्याचीपण, त्यातच त्यांच्या सुखाच समाधानाच सार दडलेल आहे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nirmala.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 385
  • Gender: Female
  • nirmala.
Re: What is प्रेम लव ?
« Reply #1 on: November 25, 2009, 01:40:14 PM »
chaan aahe lekh :)

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: What is प्रेम लव ?
« Reply #2 on: November 26, 2009, 12:05:31 AM »
ha para khup avadala mala

प्रेम हे सहवासाने निर्माण होते.प्रेम होण्यासाठी ती व्यक्ती आवडण तर जरुरी आहेच पण त्या ही पेक्षा गरज आहे त्या व्यक्तीला आपण पुर्ण ओळखण, त्याच्या गुणांइतकच दोषांसकट ती आवडण, त्याच्या स्वभावातल्या खाचाखोचा कळण आणि आपलेही प्रॉब्लेम्सची, गुणावगुणांची माहीती असण आणि त्याला ती व्यक्ती ऍडजस्ट होइल अशी खात्री, विश्वास म्हणजे प्रेम. नुसत तुम्हाला प्रेम वाटुन उपयोग नाही त्या ही व्यक्तीला तितक्याच ऊत्कटतेने तुमच्याबद्दल वाटते का? हे बघणही जरुरी आहे नाहीतर ते एक तर्फ़ीच होइल.

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: What is प्रेम लव ?
« Reply #3 on: November 26, 2009, 12:06:34 AM »
 :)
« Last Edit: November 26, 2009, 12:07:30 AM by santoshi.world »

Offline Shyam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
  • Gender: Male
Re: What is प्रेम लव ?
« Reply #4 on: November 26, 2009, 09:44:47 AM »
Sundar.... :)

Offline Parmita

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
Re: What is प्रेम लव ?
« Reply #5 on: December 19, 2009, 01:17:25 PM »
khoop chaan lekh ahe ha....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):