Author Topic: फक्त तुझ्यासाठी!!!!!!  (Read 1401 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
फक्त तुझ्यासाठी!!!!!!
« on: May 30, 2015, 01:08:13 PM »
लाखातील एक दिवस आजचा
थोडा होता रोजच्याच सारखा
कधीतरी आज मनासारखे झाले
मन माझे थेठ सहाला परत आले

पहाटे पहाटे आकाशाने स्वागत केले
वाऱ्याने शुभेच्छांचे स्वर लगेच धाडले
मनामध्ये आनंदाचे झरे वाहत होते
त्या पाण्यातही भितीने प्रतिबिंब कापत होते

चांगला संकल्प करून, नव्या विचारांना धरून
बिनधास्त जगायचं ठरवलं
क्षणात समाजातील नियमांनी
पाऊल माझं अडवलं

निराश न होता पुन्हा खंबीर झाले
प्रेमाचे शब्द  S.M.S ने आले
मनातील आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता
माझा चेहरा मलाच बघून हसत होता

तो आनंद कैद करून ठेवला संध्याकाळसाठी
दिवसभर चेहरा लपवला फक्त तुझ्यासाठी!!!!!!


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता