Author Topic: त्यादिवशी पडणारा पाऊस!!!!  (Read 1310 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
त्यादिवशी पडणारा पाऊस
बरच काही बोलुन गेला
खळखळ करणारा आवाज
कानात काही सांगुन गेला
ती पावसात चींब भिजली
माझ्या मनात भीती दाटली
तीला भिजताना पाहुन
मलाहि थंडी वजली
तेवढयात मेघ गरजला
तीने माझा हात धरला
काही कळणार एव्हढ्यात
गार वारा सुटला
दोघांना काही कळत नव्हत
कळल तरी वळत नव्हत
पाऊस एकाएकी शांत झाला
तीचा हात माझ्यापासुन दुर गेला
माझ्या मनात एकच विचार आला
पडणारा पाऊस तीच्यामाझ्यातील
अंतर मिटवून गेला.....

$ vidyakalp $
« Last Edit: April 20, 2014, 10:40:22 AM by vidyakalp »