Author Topic: फक्त इतकेच !!!!  (Read 2064 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
फक्त इतकेच !!!!
« on: June 29, 2014, 02:05:39 PM »
आलो तुझ्यापाशी देवा, मागाया तुज काही,
आजवर कधी तुला, काही मागितलंच नाही...

तिची हर एक इच्छा, न मागताच पूर्ण होऊ दे !
आयुष्यात तिच्या नेहमी, सुखच सुख येऊ दे !

दुखाची सावली न कधी, पडो तिच्या सुखावर,
असा काही चमत्कार, तुझा तेवढा घडू दे !

या सर्वात मला ती, विसरली तरी चालेल,
माझ्या मनात तिची जागा, सदा तशीच राहू दे !

जरी या बदली सुखासोबत, प्राणही माझे असू दे,
पण हे देवा मागणे माझे, इतके पूर्ण होऊ दे !!!
पण हे देवा मागणे माझे, इतके पूर्ण होऊ दे !!!

स्वलिखित
२८/०६/२०१४
रात्री ०९:३७

Marathi Kavita : मराठी कविता