Author Topic: याले म्हणते प्रेम !!!  (Read 2226 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
याले म्हणते प्रेम !!!
« on: May 21, 2014, 03:04:30 PM »
याले म्हणते प्रेम !!!

एकडाव तिच्या मी मांग फिरत होतो,
चानस पाहून तिले मी फुल देणार होतो..

थांबवून म्हटलं तिले  मी होय तुया लवर,
थे म्हणे जपून संग हाय दोन कवर..

म्हटलं सालं हे लय लवकरच मानली,
तवा कोणतरी मले लाथ मागून हाणली..

खुलला जवा डोया पुढ उभे आमचे फादर,
कवट्यात होती उशी न गुतली होती चादर..

सांग म्हणे बाबू आलिया का सनी ??
म्हटलं खरच नव्हत हो कोणी !!

आजकाल तू म्हणे शायना बनून रायला जास्त,
पायतो रोज तुले तू झोपेमंदी हासत..

मनात म्हटलं - बाबा तुमाले सांगू तरी कसा,
सोडा मले आता न पेपर वाचत बसा..

नवती सनी आलिया नवती तिसरी कोण,
सपनात तुमची सून संग भाऊ तिच्या दोन..

तिले फुल देत म्हणून मले धुवत होते,
खलबत्त्यात टाकून जसं लसन कुटत होते..

तुमाले नाई समजणार माय वाल दुखण,
माय झोपेत हासण न चादरीच गुतन..

याले मंते प्रेम तुमचा पोरगा प्रेमवीर,
मी तिचा रांझा न थे माई हीर !!

बर झालं बाबा मले लाथ हाणली,
आज भर चौकात आपली इमेज वाचून रायली..

नाही त आज तिन काय इचार केला असता ??
थोच इचार करत रायलो दात घासता घासता...
                       
                                   -   प्रसाद पाटील
                                       (स्वलिखित)

Marathi Kavita : मराठी कविता