Author Topic: प्रेम.....!!!  (Read 1913 times)

प्रेम.....!!!
« on: July 27, 2014, 12:09:04 PM »
प्रेम.....!!!

या जगात खरं प्रेम,
सहजा-सहजी मिळत नसतं,
जर मिळालं तरी,
ते लवकर कळत नसतं.....

जरी कळलं तरी,
ते विचारात वळत नसतं,
असच असतं हे प्रेम,
लुकलुकणा-या ता-यासारखं.....

जे पाण्यासारखं नितळ असतं,
मधासारखं गोड लागतं,
हवेसारखं शितल असतं,
चवेला कैरीसारखं आंबट लागतं.....

असूनही दिसत नसतं,
दूर राहून सतवत असतं,
जवळ असता भांडत राहतं,
विरहात रडत असतं.....

दूराव्यात झूरत मरतं,
भेटीसाठी तडफडत राहतं,
मिठीत येता सुखावतं,
स्पर्शात मोहरुन जातं.....
.♥.  :-*  .♥.  :-* .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २७/०७/२०१४...
सकाळी ११:५३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता