Author Topic: कातरवेळ !!!  (Read 1369 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
कातरवेळ !!!
« on: September 25, 2014, 12:16:04 PM »
कातरवेळ सुनी वाट,
मंद वारा ढग नभात..
तिथे तू आणि एकांत,
त्यात मी वेडा तुझ्या साथ..
पुढे चालत तू, मी पाठोपाठ..
कधी गुणगुणत, कधी गाणे गात..
मना मोहरे, तुझी हर एक बात..
दिसे गोडवा, तुझ्या डोळ्यात..
तुझं बोलण, साठे उरात..
जसं अथांग पाणी, सागरात..
जरी सागरी ह्या, लाटा शांत..
पण वादळे, माझ्या मनात..
माझं प्रेम तुला हे, ना ग आहे ज्ञात..
कधी वाच ना, माझ्या डोळ्यात..
संध्या सरली आता, आली वैरी रात..
आता मीच माझा, तू ना माझ्या साथ..
आता मीच माझा, मीच माझ्या साथ..
                                 
                                 प्रसाद पाटील
                                (स्वलिखित)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कातरवेळ !!!
« Reply #1 on: September 27, 2014, 04:09:57 PM »
nice...... :)