Author Topic: प्रेम व्यक्त....!!!  (Read 4159 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
प्रेम व्यक्त....!!!
« on: January 22, 2015, 04:17:52 PM »
कवितेचे नाव - " प्रेम व्यक्त "
            कवी - वैभव यशवंत जाधव


पहिल्या भेटीत होतं प्रेम..
प्रेमात वाटतात पापण्यांचं खरं
मित्रांच खरं
प्रत्येक स्वप्न वाटतं खरं..!!

प्रियेला प्रेम व्यक्त करण्यास
नाही होतं हिम्मत
आज बोलायचं म्हणुनी
ठेवतो मनात

मी पण आहे का तिच्या मनात ?
असा प्रश्न पडतो माझ्या मनात

नजरेस नजर भिडली
पाहुनी मला ती गाली हसली
मग वेळच कसली
सांगुन टाकलं एका शब्दात

"तू खुप आवडतेस मला
मी पण आवडतो का तुला
ए,माझ्या गुलाबाच्या फुला
आता सांगशील का उत्तर मला"

पडला विचार मनात.....
जर नाही म्हणाली तर
ठेच पोहचेल माझ्या काळजात
अगं प्रिये सांगशील का मला तू
काय आहे तुझ्या मनात
काही असेल तर म्हण तू
एकाच शब्दात

प्रेम व्यक्त करताना वाटली भीती
विचार करा कशी झाली असेल माझी स्थिती
सांगायचं होतं मनात भरपूर तरी किती
पण नाही केली मी अती
नाहीतर झाली असती ना माझी माती......!!

V.J.

Marathi Kavita : मराठी कविता


Reshma....

  • Guest
Re: प्रेम व्यक्त....!!!
« Reply #1 on: January 23, 2015, 12:27:25 AM »
Khup chan

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
Re: प्रेम व्यक्त....!!!
« Reply #2 on: February 07, 2015, 06:24:09 PM »
धन्यवाद