Author Topic: कविता चोरांसाठी !!!  (Read 1028 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
कविता चोरांसाठी !!!
« on: March 05, 2015, 01:29:57 PM »
 ;)

कवितेच्या नावाला उगीच बट्टा लावू नका
दुसर्याच्या कविता अशाच चोरू नका...

कविता असते ह्रदयाचा ठाव घेणारी भावना
कविता असते  मनाची अक्षरी संवेदना
कुणाच्या भावनेशी असेच खेळू नका...

कविता चोरुन कुणी कवि बणत नाही
चोरीच्या कवितेने समधान मिळत नाही
कविताचोर म्हणून स्वतःची ओळख बणवू नका...

इतरांच्या कविता स्वत:च्या नावे खपवू नका
कवीँचे डोके तुम्ही उगीच तापवू नका
बना रसिक तुम्ही काँपीपेस्ट करु नका

बना असे काही कि तुमचेही नाव होईल
एखादा कवी तुमच्यावर ही कविता लिहील
"नक्कल केल्याने अक्कल नाही येत" कधी विसरू नका..

.---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Rajshri kahate

  • Guest
Re: कविता चोरांसाठी !!!
« Reply #1 on: March 18, 2015, 12:35:09 PM »
kavi choransathi chhan msg aahe..