Author Topic: याद!!!  (Read 879 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
याद!!!
« on: July 27, 2015, 10:26:51 AM »
याद !!!
अशा सांजवेळी तुझी याद यावी
अन् समोरी तु अशी दिसावी
जसे चांदण्यांनी नभ हे खुलावे
गालावर ऊषेचे रंग हे ऊधळून यावे
**
नभा आडूनी जणू चंद्र ही दिसावा
तुझ्या हसण्याचा अर्थ ही कळावा
नयनात अलगद कोर का दिसावी?
मनोमनी तु लाजून चुर व्हावी
**
तुझ्या लाजण्याचे गूढ ते ऊकलावे
तुला भेटण्या मन का आतुर व्हावे?
अबोल्यात तुझ्या मी का त्रस्त व्हावे
ह्रदय तुझे-माझे का एक व्हावे
**
प्रकाश साळवी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
Re: याद!!!
« Reply #1 on: July 27, 2015, 01:02:12 PM »
chan!