तू मी आणि ती
एकांत घालवणारी,
आणि शब्द वाढवणारी,
उदासीन फुलाला ही फ्रेश करणारी,
आपल्या दोघांमधली
फक्त एक कॉफी...
आता काय ठेवलय बाकी,
तुला आपलास करण्यासाठी,
किती वेळा मागितली मी माफी
चल न घेऊ या एक कॉफी...
शब्द दिला तू मला
आज नको उद्या म्हणत,
ठेवलं उधाण मनाला
आशेवरच झुरत,
सांग ना जाऊया कधी परत
क्षण आला मुहूर्त घडला,
चाहूल लागली ती आल्याची,
भेट झाली शब्द वाढले,
पुन्हा ओढ लागली तिला भेटण्याची...
बोलणे ते कमी झाले,
कॉल मेसेज बंद झाले
केला मेसेज how are you?
रीप्लाय comes Who are you?
मन क्षणात गोंधळले,
थोडेसे सावरून मन मनास बोलले,
शब्द वाढवणारी नव्हती ती,
तर होती ती आशेच बिल फाडणारी
मला पुन्हा एकांतात आणणारी,
फक्त एक कॉफी...!!
कवि:- रवि सुदाम पाडेकर
घाटकोपर,मुंबई
मो.- ८४५४८४३०३४