Author Topic: काय झालंय तुला वेड्या ...!!!  (Read 1690 times)

Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
तुझे सुंदर डोळे......
जणू निरभ्र गगन निळे.
तुझा गोरा रंग..
बघूनच झालोय मी दंग..
तुझ्या हलणाऱ्या भुवया...उडणारे केस..
जणू वाटतंय बहार आलाय..!!
आणि वसंत ऋतू फुललाय..
त्या तुझ्या नाजूक पावलांच्या खुणा..
चक्क भारावून टाकतात मझ्या मना..
तुझ गोड हसन
हसताना  हळुवार लाजन..
किती शांत वाटतंय ..
आणि ते सुख माझ्या हृदयात दाटतय
वाटत कि मन मोकळ कराव..
आणि तुझ्याजवळ येवून बोलाव
पण जमत नाही मला ते..
कसे सांगू मी या वेड्या मनाला
त्या सोबती असलेल्या क्षणाला
जीवनातला प्रत्येक क्षण..
आणि सोबत हे वेड मन..
फक्त तुझाच चेहरा आठवतंय.
आणि प्रत्येक आठवण साठवतंय
हि कसली जादू ..केलीस माझ्यावर !!!
मनातच हसतोय
हसताना अडवतोय..
आणि मनाशी विचारतोय.
काय झालंय तुला वेड्या..
कधी कधी पाखरू बनून उडायला लागतंय..
तर कधी उगाच तुटलेले तारे शोधायला लागतंय..
मग हळूच म्हणतंय कि हे खोट असतं..
आणि प्रेम हे खर कधीच नसत..
मग अस का मी करतोय...
आणि सारख सारख झुरतोय..
आणि मनाशी विचारतोय ..
काय झाली तुला वेड्या...!
काय झालंय तुला वेड्या ...!!!
-- बलराम भोसले