Author Topic: जय हनुमान..........!!!  (Read 1228 times)

Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
जय हनुमान..........!!!
« on: January 20, 2012, 07:59:15 PM »
इतक्या लवकर कशी आटली..
माझ्या  सोम रसाची बाटली..
हि नाही कटली
तर उद्या दुसरी पटली..
म्हणून कित दिवस उरायचं..
आणि कुणासाठी झुरायचं..??
हि नाही ती ती नाही हि..
अजून किती भरू मी फी..
शाळा झाली कॉलेज झाल..
आता एम टेक पण आल..!!
अजून पण मी आहे पांढरा..शिपट
अग काळी वा गोरी कसली तरी पट..
केस गळत आहेत ..पडतंय मला टक्कल..
आता तरी पोरींनो येवू द्या न अक्कल..
एक बिचारा..प्रेमाचा मारा..
आता कुणी तरी द्या त्याला सहारा..
माझ्या ह्या उनाड पडलेल्या रात्री..
ते काळे निळे होणारे दिवस..
काय करू मी..
माझा प्रत्येक सवंगडी माझा मित्र...
ठेवतो  एका तरी मुलीचं चित्र..
आता कधी ....रंगीत होईल हा कागद कोरा.
कधी वर चढेल माझ्या प्रेमाचा पारा..

जावूद्या..नाही खरच जावूद्या..
जे व्हायचं ते होवूद्या..
आता कुणाला पण नाही कटवीनार..
आणि कसली भी नाही पटविणार..
कोरा तर कोरा...पांढरा तर पांढरा..
आता फक्त बांधणार मी कंबर दोरा..
अशी रोड वर थांबून मागणे भिक..
त्या पेक्षा संत बाबा बनणेच ठीक..
नको ह्या मुली..
आणि जळणाऱ्या चुली..
आणि तो पांचट वेडा नाद..
फक्त खायचा आता देवाचा प्रसाद..
शेवटी येयील न्यायला देवच विमान..
त्या साठी आता फक्त जय हनुमान....
जय हनुमान..........
धन्यवाद......!!!!
--- बलराम भोसले
« Last Edit: January 20, 2012, 07:59:53 PM by balram04 »

Marathi Kavita : मराठी कविता