Author Topic: !! खरच आज मला मनापासून, काहीतरी वेगळ करू वाटतय !!  (Read 1897 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!! खरच आज मला मनापासून, काहीतरी वेगळ करू वाटतय !!खरच आज मला मनापासून, काहीतरी वेगळ करू वाटतय ..
ते प्रेमाने भरलेल्या शब्दांच जाळ आज, मनात माझ्या दाटतय ..
.
या दाट पडणाऱ्या पावसाचे, मला पाणी बनू वाटतय ..
त्या मधुर गाणाऱ्या कोकिळेचे, मला गाणे बनू वाटतय ..
.
या नदीवरच्या लकलकनाऱ्या पाण्याची, मला चमक बनू वाटतय ..
त्या कुसुमाग्रजांच्या मधुर कवितेचे, मला यमक बनू वाटतय ..
.
या वाऱ्याने हलणाऱ्या वहीतले, मला पान बनू वाटतय ..
त्या उंदराची चाहूल घेणाऱ्या मनी, मला चे कान बनू वाटतय ..
.
या प्रेयसीच्या ओठांवरचा, मला स्पर्श बनू वाटतय ..
त्या प्रियकराच्या मनामधला, मला रोमहर्ष बनू वाटतय ..
.
या मित्रांचा मैत्री मधला, मला विश्वास बनू वाटतय ..
त्या जन्म देणाऱ्या आईचा, मला श्वास बनू वाटतय ..
.
या उगवणाऱ्या सूर्यदेवाचे, मला किरण बनू वाटतय ..
त्या मधुचंद्राच्या रात्रीतिले, मला मिलन बनू वाटतय ..
.
या नटनारया नवरीचा, मला साज बनू वाटतय ..
त्या विरहात बुडलेल्या प्रियकराचा, मला आज बनू वाटतय ..
.
या देवारयातील अगरबत्ती ची, मला धूप बनू वाटतय ..
त्या आई च्या प्रेमळ कुशिमधील, मला उब बनू वाटतय ..
.
या चालणाऱ्या लहान बाळाचा, मला तोल बनू वाटतय ..
ही कविता वाचणाऱ्या व्यक्तीचे, मला बोल बनू वाटतय  ..
.
खरच आज मला मनापासून, काहीतरी वेगळ करू वाटतय ..
ते प्रेमाने भरलेल्या शब्दांच जाळ आज, मनात माझ्या दाटतय ..
                                                                            © Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

 • Guest
त्या प्रियकराच्या मनामधला, मला रोमहर्ष बनू वाटतय .......KHUP CHAN

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com