Author Topic: !! टाईम पास !!  (Read 2492 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! टाईम पास !!
« on: June 05, 2014, 10:11:37 AM »
!!  टाईम पास  !!
 
लाईफ मधे आपल्या कडे
एक तरी टाईम पास हवा
..  थोडा का होईना
..  पण तो टाईम खास हवा

बोलण्या साठी रोज
एक वेळ खास तरी हवा
..  थोडा का होईना
..  पण तो ञास रोज हवा

मी कुठे म्हणतो मला
रोज रोज भेटायला तिने यावा
..  पण थोडा वेळ माझ्या साठी
..  तिच्या कडे रिजर्व्ह माञ हवा

लाईफ मधे आपल्या कडे
एक तरी टाईम पास हवा
..  थोडा का होईना
..  पण तो टाईम खास हवा

मी तिला सतत मेसेज केले
याचा तिला राग माञ नसावा
..  पण माझ्या ईनबोक्स मधे रोज
..  एक तिचा मेसेज माञ असावा

माझ्या सोबत बोलण्यासाठी
तिच्या कडे बहाणा रोज असावा
..  बोलताना दोघांमधे कधी
..  ते भांडण माञ नसावा

लाईफ मधे आपल्या कडे
एक तरी टाईम पास हवा
..  थोडा का होईना
..  पण तो टाईम खास हवा
 
तु दिलेली पञे
मी अजून जपून ठेवलीये
..  अठवणींच्या कुशीत
..  मी तशीच सजून ठेवलीये

माझ्या ही पञांचा तुझ्या कडे
तो ठेवा माञ असावा
..  मी पाठवलेल्या पञांचा ढिग
..  त्या रद्दीत माञ कधी नसावा

लाईफ मधे आपल्या कडे
एक तरी टाईम पास हवा
..  थोडा का होईना
..  पण तो टाईम खास हवा

त्या पावसामधे भिजताना
एक हात माञ हाती हवा
..  भिजण्याचा आनंद लुटण्या साठी
..  एक साथी माञ हवा

सतत धिर देणारा तो
हात पाठी हवा
..  आयुष्यात एकदा तरी असा
..  तो टाईम-पास माञ हवा

©  चेतन ठाकरेMarathi Kavita : मराठी कविता