फुलांची पापणी हि ओली
कुणासाठी...
पहाटे जाग हि आली
कुणासाठी...
सुखाची हाक येतांना
दु:खे दाटून का येती
असे ओढुनी हे नेती
कुणासाठी...
चांदण्या या शांत रात्री
जुहीच्या मांडवाखाली
उर हे भरुनी येती
कुणासाठी...
सर्वत्र काळोख असतांना
हा तारा मात्र चमकतो
कुणासाठी...कुणासाठी...
(एक विनंती...कुठलीही चूक झाल्यास क्षमस्व:
_गौरव(जी.डी.)