Author Topic: !! फक्त एकदाच.....!  (Read 2274 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
!! फक्त एकदाच.....!
« on: April 25, 2014, 07:31:57 PM »
!! फक्त एकदाच.....!

फक्त एकदाच माझे डोळे वाचशील का गं ?
जर दिसली नाहीस  त्यात तू  कुठेही ......
तर तुला  कधीच दिसू  देणार नाही माझी सावलीही...
फक्त एकदाच  माझा आवाज ऐकशील का गं ?
जर दिसला नाही त्यात तुझा सूर कुठेही…
तर तुला कधीच ऐकू येऊ देणार नाही माझा कंठ नादही ….
फक्त एकदाच मला काही ते सांगशील का गं ?
जर नको असेन तुला  मी  तुझ्यात कुठेही ……
तर यडुले काळीज मुठीत धरून सांगतो
तुला नाहीच दिसू देणार स्वतःला कुठेही अन कधीही ……. 

 मयूर जाधव
 कुडाळ ( सातारा )
 +918888595857

Marathi Kavita : मराठी कविता