Author Topic: प्रत्येकजण कधी ना कधीएकदातरी प्रेमात पडलेला असतो !!  (Read 2375 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 492
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण ,
प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेह-याला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण ,
प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी ,
तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते
तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार ,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण,
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला ,
दुःखं कधीच उमगत नाही
तिच्या क्षणभर दुराव्यानेही ,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण ,
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

बरं यालाच प्रेम म्हणावे तर ,
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतचं प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
अगदी शुध्द प्रेमाची आशा करतात

अशाच समाज-कंटकांमुळे ­,
प्रत्येकजण प्रेमात थोडा रखडलेला असतो
तरीदेखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा
एकदातरी प्रेमात पडलेला असतो
एकदातरी प्रेमात पडलेला असतो ...

नाही बांधू शकत ताज महल मी
म्हणुन काय मी शोक करत बसायचे
प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे
ठरविले मी काही तरी लिहायचे
घेतला आधार मी शायरीचा
आणि ठरविले मनसोक्त वहायचे
नाही जमल ताज महल तर
यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे
नाही होऊ शकत नायक मी
म्हणुन काय नालायक व्हायचे
खुप मनापासून केलेल प्रेम
पायाखाली तूडवायचे .
ठरविले मी नाही आता नाही
तटस्थ आपण रहायचे
तोडून सारी बंधने
प्रेमसागारत डुबायचे...

                                     ---unknown
« Last Edit: January 28, 2013, 05:01:51 PM by श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 492
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Kedarji, prajdeepji, prajunkushji..
Saglyanche dhanyavad..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):