Author Topic: खुप खुप वाटतं केव्हा तरी...!!  (Read 1493 times)

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
धावत तुझ्या जवळ यावं,
तुला घट्ट मिठीत घेऊन,
प्रेमाने बहूपाशात कवटाळावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
मी येताच तु गोड हसावं,
माझ्या नजरेला नजर भिडवून,
i love u शोन्या म्हणावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुप भांडावं,
पुन्हा ते भांडण मिटवून,
मला प्रेमाने sorry बोलवं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु नेहमी माझ्या जवळ असावं,
माझ्याशी वेडे वाकडे बोलून,
माझ्यावर हक्काने रागवावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु मला नेहमी भेटायला यावं,
आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच,
खोटं खोटं नाटक करावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुपकाही बोलावं,
माझ्याशी बोलता बोलता,
तु स्वतःलाच माझ्यात विसरावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तुझं माझं एक छोटसं घर असावं,
त्या घरट्या फक्त तु आणि मी,
आपण दोघेच सोबत रहावं.....

खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं,
मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात,
माझ्यात फक्त तुच उरावं.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-१०-२०१३...
सांयकाळी ०८,०२...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: October 10, 2013, 09:57:33 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »