Author Topic: असा तो तशी ती...!!  (Read 1423 times)

असा तो तशी ती...!!
« on: October 12, 2013, 09:33:03 PM »
असा तो तशी ती...!!

तो आहे जरा मंद,
ती आहे जरा वेडी,
तो गोड बोलत असताना,
ती काढते त्याची खोडी.....

तो तिला प्रेमाने पिल्लू म्हणतो,
ती त्याला नजरेने मारते गोळी,
दोघे ही स्वतःपेक्षा जास्त ओळखतात,
असुनही ऐकमेकांना अनोळखी.....

असा तो तशी ती...!!

तो जरा जास्तच मुर्खपणा करतो,
ती आहे जराशी भोळी,
खरच हे नाते खुपच सुंदर आहे,
सुखाने भरली यांची झोळी.....

तो कधी रागावतो तिच्यावर,
ती चुकल्यावर म्हणते साँरी,
तो रुसतो तिच्यावर तेव्हा,
ती लावते त्याला लाडी गोडी.....

असा तो तशी ती...!!

तो दिसायला जरा साधारणच आहे,
ती दिसायला अगदी आसमंत परी,
कितीही भांडले तरी त्यांची,
लक्ष्मी-नारायणाची शोभते जोडी.....

तो नेहमी ओरडतो तिला,
ती नेहमी चुका करते वेडी,
तो i love u बोलताच,
ती लाजेने चुरचुर होते थोडी.....

असा तो तशी ती...!!

दोघेही समजुन घेतात ऐकमेकांना,
जिवापाड जपण्याचा प्रयत्न करतात,
असेच असते खरे प्रेम,
बांधली आहे पायात प्रेमाची बेडी.....

तो फक्त तिचाच विचार करतो,
ती त्यालाच स्वप्नात पाहते,
दोन अनोळखी मने जुळून आलीत,
हातात बांधली सातजन्माची हातकडी.....

असा तो तशी ती...!!

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १२-१०-२०१३...
सकाळी ०७,३८...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: October 13, 2013, 02:57:33 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता

असा तो तशी ती...!!
« on: October 12, 2013, 09:33:03 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
Re: असा तो तशी ती...!!
« Reply #1 on: October 12, 2013, 09:42:42 PM »
वा अप्रतिम सर.... :)

Offline sappubhai

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: असा तो तशी ती...!!
« Reply #2 on: October 14, 2013, 02:49:19 PM »
maja aali....


मराठीबोली.इन लेखन स्पर्धा.[/size]बक्षिसे.प्रथम परितोषिक - शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.द्वितीय परितोषिक - मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.

तृतीय परितोषिक - मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.
अधिक महितीसाठी भेट द्या :
http://marathiboli.in/marathiboli-in-competition/[/size]

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):