Author Topic: तुझ्याशिवाय खरं तर मला करमत नाही...!!  (Read 1995 times)

तुझ्याशी बोलताना,
शब्दच सुचत नाही.....

मुक होतात ते ही,
कवितेचे यमकही जुळत नाही.....

नेहमी करत असतो नजरेने इशारे तुला,
तुझ्याविणा मन कुठेच रमत नाही.....

तुझ्या सोबत फिरताना,
घराची थोडीही आठवण येत नाही.....

तु सोबत रहा अशीच,
मी बाकी काहीच मागत नाही.....

फक्त तुझाच विचार असतो,
नेहमी कोवळ्या मनात माझ्या.....

खुप खुप तरसतो रोज तुला भेटायला,
तुझाच असतो ध्यास जिवाला.....

तु नसलीस की जग सुने वाटते,
तुझ्याविणा मला जराही
राहवत नाही.....

खुप खुप miss करतो रोज तुला,
तुझ्याशिवाय खरं तर मला करमत नाही.....

तुझ्याशिवाय खरं तर मला करमत नाही.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-१०-२०१३...
सांयकाळी ०८,२७...
© सुरेश सोनावणे.....