Author Topic: विसरलो नाही मी...!!  (Read 1629 times)

विसरलो नाही मी...!!
« on: October 17, 2013, 09:44:19 PM »
ते भिजलेले क्षण,
त्या भिजलेल्या आठवणी.....

ती अंधारलेली एकटी रात्र,
ते तुझे मधाळ बोलणे.....

विसरलो नाही मी...!!

ते मिठीतले गोड क्षण,
त्या ओल्याचिँब साठवणी.....

ती लाबसडक केसांची बट,
ते थरथरणारे नाजुन ओठ.....

विसरलो नाही मी...!!

ते मनात दडलेले गुपीत,
त्या बेभान करणा-या धुनी.....

ते पावसाचे टपकणारे थेँब,
तो ओल्या देहाचा उबदार स्पर्श.....

विसरलो नाही मी...!!

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १७-१०-२०१३...
सांयकाळी ०७,५२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता