Author Topic: हे खास तिच्यासाठी...!!  (Read 3027 times)

हे खास तिच्यासाठी...!!
« on: October 20, 2013, 05:16:06 PM »
हे खास तिच्यासाठी...!!

काय वाटते मनाला,
काहीच कळत नाही.....

कारण ???

खरं तर मन ही आता,
तुझ्याविणा कुठेच रमत नाही.....

काय चालते मनात,
काहीच समजत नाही.....

कारण ???

तुझ्याशिवाय खरं तर,
मला करमत नाही.....

काय लागतेस तु माझी,
मला सांगता येत नाही.....

कारण ???

तुझ्याशिवाय मन माझे,
दुसरे काहीच मागत नाही.....

का रडते मन एकटेपणात,
खरच मला उमजत नाही.....

कारण ???

तुझ्यावर लिहलेल्या कवितांना,
शब्दात बांधता येत नाही.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २०-१०-२०१३...
दुपारी ०४,१२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


minal ambre

  • Guest
Vedya mana sang na...
« Reply #1 on: October 22, 2013, 01:29:05 AM »
Man udas udas....
Tyala lage tuzi asss...
Kaa lage jiva aas...
Vedya mana sang na...
Vedya mana sang na...
vedya mana sang na....