Author Topic: माझ्यात तु तुझ्यात मी...!!  (Read 1813 times)

माझ्यात तु तुझ्यात मी...!!
« on: October 24, 2013, 09:35:30 PM »
माझ्यात तु तुझ्यात मी...!!

माझ्या थरथरणा-या ओठांच्या शब्दांना,
न सांगता ओळखावं तु,
मी पाहीलेल्या स्वप्नांना,
यशस्वीपणे पुर्ण करावं तु.....

मला न भेटता न पाहता,
माझ्यात प्रतिलिपीत व्हावं तु,
माझ्या अधु-या सुरांना,
तालात गाण्यासारखं गावं तु.....

माझ्या खोडकर स्वःभावात,
मिश्कीलपणे मिसळावं तु,
माझ्या आठवणी गुंतुन,
मला तुझ्यात समावून घ्यावं तु.....

आपल्या प्रत्येक भेटीला,
अखेरची भेट समजावं तु,
निरोप माझा घेताना
i miss u म्हणावं तु.....

माझ्या अबोल नजरेत,
असं काही उतरावं तु,
मी बघावा आरसा,
त्यात ही दिसावं तु.....

मी हे जग सोडून गेल्यानंतर,
माझा अखेरचा श्वास थांबण्या अगोदर,
शेवटच्या क्षणी पापण्या मिटल्यावर,
माझ्या फक्त उरावं तु.....

i love u shona...

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-१०-२०१३...
सांयकाळी ०८,२५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता