Author Topic: मी आजही तुझ्यावर प्रेम करत आहे...!!  (Read 1866 times)

तुझ्या परतून येण्याने,
मनात सुखाचे काहूर माजत आहे.....

तु काय आहेस माझ्यासाठी,
हे तुझ्या परतण्याने जाणवत आहे.....

आता येऊन परत जाऊ नकोस,
आयुष्यात तुझीच गरज भासत आहे.....

मान्य आहे मी ही चुका केल्या,
तुला नेहमी चुकीच बोलत होतो.....

पण ???

आज त्या सगळ्या चुकांची भरपाई,
तुला पुन्हा मिळवून करत आहे.....

खुप काही गमावले होते तु जाण्याने
सर्वकाही आता व्यवस्थीत होत आहे.....

नको करुस आता दुराव्याची भाषा पुन्हा,
मनाला तुझा सहवास आवडत आहे.....

जशी आहेस तशीच रहा तु,
मी आजही तुझ्यावर प्रेम करत आहे.....

मी आजही तुझ्यावर प्रेम करत आहे.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०१-११-२०१३...
सकाळी ०७,३१...
© सुरेश सोनावणे.....