Author Topic: तुझ्यासवे असताना...!!  (Read 1499 times)

तुझ्यासवे असताना...!!
« on: December 06, 2013, 06:47:23 PM »
तुझ्यासवे असताना,
माझे मी पण विसरलो.....

कधी खुप हसलो,
कधी खुप रडलो.....

कधी खूप भांडलो,
कधी खूप चिडलो.....

कधी खूप रुसलो,
कधी पटकन मानलो.....

कधी दूर झालो,
कधी परतून आलो.....

कधी धडपडलो,
कधी सावरलो.....

कधी बडबडलो,
कधी बावरलो.....

नकळत स्वतःलाच का,
नाहीसे करुन मी.....

तुझ्यात आपोआप,
ओढल्या गेलो.....
[♥] [♥] [♥] [♥] [♥]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१२-२०१३...
दुपारी ०३,४८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता