Author Topic: एकदा मिठीत ये ना प्रिये...!!  (Read 2217 times)

एकदा मिठीत ये ना प्रिये,
नजरेशी नजरेने बोलायला,
माझ्याशी हितगुज करायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये,
अबोल उखाणे ऐकवायला,
मनातले गुपित उलगडायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये,
ओठांनी ओठात गुंतायला,
श्वासात श्वास होवून मिसळायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये,
कवितेत शब्दांचे यमक जुळवायला,
अबोल गीतांना सप्तसुरात सजवायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये
 जिवापाड प्रेम दाखवायला,
ह्रदयात धडकन बनून स्पंदायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये,
जगाच्या मर्यादा ओलांडायला,
प्रेमाचा अर्थ समजवायला.....

एकदा मिठीत ये ना प्रिये,
अलगद बहूपाशात शिरायला,
i love u हे तीन गोड शब्द बोलायला.....
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १४-१२-२०१३...
सांयकाळी ०८,०६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: एकदा मिठीत ये ना प्रिये...!!
« Reply #1 on: December 14, 2013, 10:11:17 PM »
Sureshji apratim rachana ahe...

रेखा

  • Guest
Re: एकदा मिठीत ये ना प्रिये...!!
« Reply #2 on: December 15, 2013, 10:55:22 PM »
मिठीत मीठी मीठी मिठाई मटकावूया, गडे
झोपेतल्या स्वनांमधे मी हमेशा बागडे
हाय, स्वप्नातच मटकावती मिठाई माकडे
असे काय माझे असे माकडांशी वाकडे?

रेखा

  • Guest
Re: एकदा मिठीत ये ना प्रिये...!!
« Reply #3 on: December 15, 2013, 11:00:07 PM »
मिठीत मीठी मीठी मिठाई मटकावूया, गडे
झोपेतल्या स्वप्नांमधे मी हमेशा बागडे
हाय, स्वप्नातच मटकावती मिठाई माकडे
असे काय माझे असे माकडांशी वाकडे?

रेखा

  • Guest
Re: एकदा मिठीत ये ना प्रिये...!!
« Reply #4 on: December 16, 2013, 12:34:14 AM »
मिठीत मीठी मीठी मिठाई मटकावूया, गडे
झोपेतल्या स्वप्नांमधे मी हमेशा बागडे
हाय, स्वप्नातच मिठाई मटकावती माकडे
असे काय माझे असे माकडांशी वाकडे?

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):