Author Topic: शोनू खुप खुप आठवण येते तुझी...!!  (Read 2399 times)

शोनू खुप खुप आठवण येते तुझी,
रोजच आठवणीँचा खेळ चालतो,
दुपार झाली की मी,
संध्याकाळची आतुरतेने वाट पाहतो.....
**********************
तुझाच ध्यास असतो मला,
तुझ्याच विचारात मी बुडतो,
शोनू तु भेटायला येणार म्हणुन,
सकाळपासूनच मी तयारी करुन ठेवतो....
**********************
 तु आलीस तु थांबलीस की,
तुला एकटक मी पाहू लागतो,
काय काय बोलायच तुझ्याशी,
याची सतत मी प्राँक्टिस करतो.....
**********************
तुच दरवळतेस जवळपास,
तुझेच भास होतात मला,
येता जाता जाता येता फक्त,
तुझाच निरागस चेहरा डोळ्यासमोर दिसतो.....
**********************
तुलाच पहावसं वाटतं क्षणोक्षणी,
आठवून तुला नकळत मी रडतो,
शोनू तुझ्या त्या एका भेटीसाठी,
क्षणा क्षणाला मी तरसतो.....
**********************
खरच तु माझी आहेस म्हणुन,
स्वतःला असे नेहमी बजावतो,
माझी शोनू आज येईल ना खरच,
मनाला असा वायफळ प्रश्न विचारतो.....
**********************
तु येण्याच्या विचारानेच,
मी खुप खुप खुश होतो,
मनाशीच माझ्या खुपकाही ठरवतो,
मनातच सारखा पुटपुटत असतो.....
**********************
माझेच भान राहत नाही मला,
तुलाच पाहण्यासाठी मी झूरतो,
शोनू तुझ्या प्रेमात मी,
खरच पुरता वेडापिसा होतो.....
**********************
I Love You Shonu...
[♥]  [♥]  [♥]  [♥]  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ३१-१२-२०१३...
दुपारी ०१,४६...
© सुरेश सोनावणे.....