Author Topic: मला वेड लागले प्रेमाचे...!!  (Read 3095 times)

असा काही गुंतलो तुझ्यात,
ना राहीले भान स्वतःचे.....
****************
झाली कावरी बावरी नजर माझी,
तुझ्याशी जुडले नाते मनाचे.....
****************
मला वेड लागले प्रेमाचे...!!
****************
विसरलो मी जग सारे,
ऐकत नाही मन आता कुणाचे.....
****************
बहरलेत ऋतू निरागस सारे,
उघडले दार नव्या स्वप्नांचे.....
****************
मला वेड लागले प्रेमाचे...!!
****************
माझाही विसर पडला मजला,
नकळत वाढले स्पंदन ह्रदयाचे.....
****************
अबोल राहून बरेच काही बोलतो,
अलगडलेले कोडे उलगडले ओठांचे.....
****************
मला वेड लागले प्रेमाचे...!!
****************
सप्तरंगाची खेळतो होळी,
उधळीतो वेगळे रंग प्रेमाचे.....
****************
छेडीतो तार सप्तसुरांची,
गायीतो तराने ऋणानबंधाचे.....
****************
मला वेड लागले प्रेमाचे...!!
****************
I Love You Shonu...
:-*   :-*   :-*   :-*   :-*
 
_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०३-१२-२०१४...
दुपारी ०४,३१...
© सुरेश सोनावणे.....