Author Topic: प्रेम हे असेच असतं...!!  (Read 1887 times)

प्रेम हे असेच असतं...!!
« on: January 17, 2014, 07:46:37 PM »
प्रेम हे असेच असतं...!!

कधी हसावं लागतं,
कधी रडावं लागतं,
कधी भांडावं लागतं,
कधी मनवावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

कधी ओरडावं लागतं,
कधी रुसावं लागतं,
कधी फसावं लागतं,
कधी सांभाळावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

कधी ऐकावं लागतं,
कधी बोलावं लागतं,
कधी जपावं लागतं,
कधी सोसावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

कधी सोडावं लागतं,
कधी तोडावं लागतं,
कधी दूर जावं लागतं,
कधी जवळ यावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

कधी बसावं लागतं,
कधी थकावं लागतं,
कधी पकावावं लागतं,
कधी गप्प बसावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

कधी चुकावं लागतं,
कधी हुकावं लागतं,
कधी तडफडावं लागतं,
कधी तरसावं लागतं.....

प्रेम हे असेच असतं...!!

नको नको ते आपल्याला,
सगळं करावं लागतं,
स्वतःसाठी न जगता,
दुस-यासाठी जगावं लागतं.....

कारण ???

प्रेम हे असेच असतं...!!
:-*  :-*  :-*  :-*  :-*

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १७-०१-२०१४...
सांयकाळी ०७,२४...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता