Author Topic: रंग तुझ्या माझ्या प्रेमाचे...!!  (Read 1832 times)

रंग तुझ्या माझ्या प्रेमाचे...!!

तुझ्या प्रेम रंगात,
असा काही रंगलो,
विसरलो सारे जग,
तुझ्यात अक्षरशा गुंतलो.....

तुझ्या डोळ्यांच्या डोहात,
असा काही बुडलो,
विसरलो निळसर आकाश,
गही-या नयनात रमलो.....

तुझ्या लाबसडक केसात,
असा काही फसलो,
सुटता सुटेना तिढा मनाचा,
काट्यागत प्रितीत रुतलो.....

तुझ्या मुलायम गालात,
असा काही हसलो,
विसरलो दुःख विरहाचे,
ह्रदयाच्या ठोक्यात धडकलो.....

तुझ्या गुलाबी ओठात,
असा काही रस रसलो,
विसरलो अमृताचा प्याला,
देहभान हरवून बसलो.....

तुझ्या उबदार मिठीत,
असा काही तापलो,
विसरलो नाते बंध जूने,
नव्या रंगात नव्याने प्रकटलो.....

तुझ्या निर्मळ मनात,
असा काही अडकलो,
विसरलो अस्थित्व माझे,
होवूनी निवडूंग बहरलो.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १६-०३-२०१४...
दुपारी ०३,४३...
©सुरेश सोनावणे.....
« Last Edit: March 16, 2014, 05:25:01 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


sunil shingne

  • Guest
v.NICE SIR..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):