Author Topic: का तुझ्यावाचून, मला करमेना...!!  (Read 2004 times)

का तुझ्यावाचून,
मला करमेना,
का तुझ्यावाचून,
मन माझे रमेना.....

का तुझ्यावाचून,
ध्यान कुठेच नसेना,
तुलाच शोधत असतो,
पण तु काही सापडेना.....

का तुझ्यावाचून,
चित्त माझे कशातचं
लागेना,
का तुझ्यावाचून,
काहीचं मला दिसेना.....

का तुझ्यावाचून,
मला दूर रहावेना,
काय करावे मी,
काहीच मला कळेना.....

का तुझ्यावाचून,
ह्रदय माझं धडकेना,
का तुझ्यावाचून,
कविता ही सुचेना.....

का तुझ्यावाचून,
श्वास घेता येईना,
का तुझ्यावाचून,
झोप मला लागेना.....

का तुझ्यावाचून,
रात्र माझी सरेना,
का तुझ्यावाचून,
दिवस माझा उजडेना.....

का तुझ्यावाचून,
दुपार माझी जायेना,
का तुझ्यावाचून,
कातरवेळ ढळेना.....

का तुझ्यावाचून,
ओठातून शब्द फुटेना,
का तुझ्यावाचून,
दुसरं काही आठवेना.....

का तुझ्यावाचून,
मन दुसरं काही मागेना,
का तुझ्यावाचून,
मला करमेना.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १९-०३-२०१४...
दुपारी ०३,२१...
©सुरेश सोनावणे.....