Author Topic: येशील का, माझ्या जिवनात तू...!!  (Read 1697 times)

♥ For My Love ♥

स्वप्नात तू विचारात तू,
धडकशील का,
ह्रदयाच्या ठोक्यात तू.....

मनात तू ध्यानात तू,
साठवशील का,
मला आठवणीत तू.....

श्वासात तू ध्यासात तू,
दरवळशील का,
प्रितीच्या गंधात तू.....

फूलात तू पानात तू,
विसावशील का,
माझ्या सावलीत तू.....

ओठात तू शब्दात तू,
सजशील का,
काव्याच्या यमकात तू.....

गाण्यात तू सुरात तू,
गुंजशील का,
पायातील पैंजनात तू.....

वेळेत तू काळात तू,
भेटशील का,
गोड क्षणात तू.....

हसण्यात तू रडण्यात तू,
समजशील का,
प्रेमळ भांडणात तू.....

रागावण्यात तू मनवण्यात तू,
सांगशील का,
मुक्या शब्दात तू.....

जिथे तिथे फक्त दिसतेस तू,
बनशील का,
या राजाची राणी तू.....

सुखात तू दुःखात तू,
होशील का,
माझी जोडीदार तू.....

दारात तू घरात तू,
येशील का,
माझ्या जिवनात तू.....

I Love You Shonu...
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २०-०३-२०१४...
दुपारी ०२,१६...
©सुरेश सोनावणे.....