Author Topic: माझ्या हर स्वासाआधी मला तुझी याद येते !!  (Read 1343 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
तू भेटायच्या आधी,
होते सारे दिन छोटे,
आता एक एक क्षण,
एक एक साल वाटे !!

होतो खुश मी माझ्यात,
कधी वाटे ना असे,
आता भर गरदीत,
जीव एकला भासे !!

मन लागे ना कश्यात,
ना भूक झोप लागे,
तुझ्या प्रेमाचे साजणे,
मनी दाटले धुके !!

आजही जेव्हा जेव्हा,
तुझी आठवण येते,
जीव कासाविस होतो,
भान हरपून जाते !!

जरी दूर तू असली,
तरी तुझी साद शोधे,
माझ्या हर स्वाशाआधी,
मला तुझी याद येते  !!
मला तुझी याद येते  !!
               
               - प्रसाद पाटील