Author Topic: हल्ली कळत नाही, काय झालय मला...!!  (Read 2842 times)

हल्ली कळत नाही,
काय झालय मला...!!

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
तुला पाहील्या पासून,
हरवून बसलोय स्वतःला.....

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
नेहमी समजावत राहतो,
माझ्या बाव-या मनाला.....

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
नकळत तुझंच नाव,
ओठावर येतं क्षणा क्षणाला.....

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
ह्रदयाच धडधडणं ही,
नाही सांगू शकत कुणाला.....

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
सुख चैन हरवून बसलो,
दुःख गोड वाटतयं मला.....

हल्ली कळत नाही,
काय झालय मला,
तुझीच ओढ तुझीच आस,
दुसरं काही सुचेना लिहायला.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५/०४/२०१४...
दुपारी ०२:५४...
©सुरेश सोनावणे.....