Author Topic: प्रेमाची निवडणूक...!!  (Read 1507 times)

प्रेमाची निवडणूक...!!
« on: April 17, 2014, 12:51:32 PM »
प्रेमाची निवडणूक...!!

प्रेमाची निवडणूक आता,

मी ही लढवणार आहे.....

भावनाचा आधार घेऊन,

शब्दांचा प्रचार करणार आहे.....

मनाला उमेदवार बनवून,

स्वप्न निशाणी ठेवणार आहे.....

तुझ्या ह्रदयाच टिकीट मिळवून,

आमदारकी मिळवणार आहे.....

तुझ्या होकारच मत मिळवून,

बिनविरोध निवडून येणार आहे.....
♥  :-*  ♥  :-*

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १७/०४/२०१४...
दुपारी १२:३६...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता