Author Topic: कल्पना !!  (Read 1729 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
कल्पना !!
« on: May 29, 2014, 02:14:25 PM »
सांग ना कधी तू, प्रेम केले काय ??
असेल केले मग त्याचे, सांग झाले काय ??

आहे अजून तसेच कि, तो सोडून गेला काय ??
तुझ्या प्रेम पुस्तकाचे, नाव तरी काय ??

जेव्हा तुझ्या मैत्रिणी असा, हट्ट करू पाहील..
सांगण्यावाचून तुझ्याकडे, पर्यायच ना राहीन..

तेव्हा तुझा सारा भूत, त्यांना सांगून देशील..
फक्त तुझा माझा तो, किस्सा सोडून देशील !!

म्हणेल त्या या पुस्तकाचे, पाने कुठे आहे ??
सांगावेच लागेल तुला, जाणे कुठे आहे ??

सांगशील हे पुस्तक, फार काळ होते बंद..
बरसायचे तेव्हा ढग, वारा वाहे थंड..

म्हणून पाने ओली झाली, काही गहाळ झाली..
काही पाने हरवली, जी सांभाळता ना आली..

सांगशील नको, आपण दोघे प्रेम करत होतो..
तेव्हा जगण्या मरण्याचे, वचन घेत होतो..

जेव्हा एक होतो तेव्हा, जग परक वाटे..
मनी प्रेम ,तनी प्रेम, प्रेम प्रेमच दाटे..

नको सांगू त्यांना नाते, आपले टिकले नाही..
जरी होते त्यात काही, आपले चुकले नाही..

तू खोटी बोलत आहे !! शंका जेव्हा घेतील..
सांभाळशील कसं ?? काय पुरावा तू देशील ??

अशावेळी माझी एकदा, आठवण काढून पाहा..
प्रेमाने तू एक हाक,  देऊन तर पाहा..

सांगशील एक मित्र माझा, माहीत त्याला सर्व !!
इतके मात्र करशील, बाजू ठेऊन तुझा गर्व !!

तू माझी मैत्रीणच !! इतके त्यांना सांगीन..
नव्हते कोणी आयुष्यात, आहे ना, न राहील..

तुझ्यावर त्या कधी, शंका घेणार नाही..
तुझ्या आता परतीची, अपेक्षा ही नाही..

खरंच अशी तुझी माझी, भेट पुन्हा होईल..
कि कल्पना हि माझी का ती कल्पनाच राहील.....
                               
                                           - प्रसाद पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Kalubhagat123@gmail.com

  • Guest
Re: कल्पना !!
« Reply #1 on: May 29, 2014, 08:28:12 PM »
Khup sundar ashi kavita ahe

vina

  • Guest
Re: कल्पना !!
« Reply #2 on: May 30, 2014, 02:40:37 PM »
सांग ना कधी तू, प्रेम केले काय ??
असेल केले मग त्याचे, सांग झाले काय ??

आहे अजून तसेच कि, तो सोडून गेला काय ??
तुझ्या प्रेम पुस्तकाचे, नाव तरी काय ??

जेव्हा तुझ्या मैत्रिणी असा, हट्ट करू पाहील..
सांगण्यावाचून तुझ्याकडे, पर्यायच ना राहीन..

तेव्हा तुझा सारा भूत, त्यांना सांगून देशील..
फक्त तुझा माझा तो, किस्सा सोडून देशील !!

म्हणेल त्या या पुस्तकाचे, पाने कुठे आहे ??
सांगावेच लागेल तुला, जाणे कुठे आहे ??

सांगशील हे पुस्तक, फार काळ होते बंद..
बरसायचे तेव्हा ढग, वारा वाहे थंड..

म्हणून पाने ओली झाली, काही गहाळ झाली..
काही पाने हरवली, जी सांभाळता ना आली..

सांगशील नको, आपण दोघे प्रेम करत होतो..
तेव्हा जगण्या मरण्याचे, वचन घेत होतो..

जेव्हा एक होतो तेव्हा, जग परक वाटे..
मनी प्रेम ,तनी प्रेम, प्रेम प्रेमच दाटे..

नको सांगू त्यांना नाते, आपले टिकले नाही..
जरी होते त्यात काही, आपले चुकले नाही..

तू खोटी बोलत आहे !! शंका जेव्हा घेतील..
सांभाळशील कसं ?? काय पुरावा तू देशील ??

अशावेळी माझी एकदा, आठवण काढून पाहा..
प्रेमाने तू एक हाक,  देऊन तर पाहा..

सांगशील एक मित्र माझा, माहीत त्याला सर्व !!
इतके मात्र करशील, बाजू ठेऊन तुझा गर्व !!

तू माझी मैत्रीणच !! इतके त्यांना सांगीन..
नव्हते कोणी आयुष्यात, आहे ना, न राहील..

तुझ्यावर त्या कधी, शंका घेणार नाही..
तुझ्या आता परतीची, अपेक्षा ही नाही..

खरंच अशी तुझी माझी, भेट पुन्हा होईल..
कि कल्पना हि माझी का ती कल्पनाच राहील.....
                               
                                           - प्रसाद पाटील