Author Topic: तू माझी अन् मी तुझा होणार...!!  (Read 2143 times)

तू माझी अन् मी तुझा होणार...!!

आज पुन्हा ते घडणार,
तू माझ्या आयुष्यात येणार,
दुःखाचा मुखवटा काढून,
मी खळखळून हसणार.....

अबोल मनातले भाव,
पाणावलेले डोळे व्यक्त करणार,
थोड्यावेळ शांत राहून,
तू मला घट्ट मिठी मारुन रडणार.....

नजरेने नजरेशी हितगुज करत,
तू मला I Love You बोलणार,
ह्रदयात रुतलेले वेदनेचे काटे,
तू नाजूक हाताने काढणार.....

अधु-या राहीलेल्या अपेक्षा माझ्या,
आज सत्यात उतरणार,
या सुकलेल्या भंगार निवडुंगाला,
प्रितीचा नव संजीवनी मिळणार.....

विसरुन जूने वाद सारे,
तू अन् मी नव्याने भेटणार,
आठवून जूने क्षण सारे,
तू माझी अन् मी तुझा होणार.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १८/०८/२०१४...
सांयकाळी ०७:२४...
©सुरेश सोनावणे.....