Author Topic: फक्त तूच...!!  (Read 3463 times)

फक्त तूच...!!
« on: January 12, 2015, 10:39:29 PM »
फक्त तूच...!!

तूच सत्य तू स्वप्न,
तूच सागर तू किनारा.....

तूच मन तू भावना,
तूच लहर तू सहारा.....

तूच आस तू आभास,
तूच कारण तू बहाणा.....

तूच श्वास तू खास,
तूच नदी तू धारा.....

तूच गाथा तू कथा,
तूच जीवन तू मरण.....

तूच ह्रदय तू धडधड,
तूच कर्म तू धर्म.....

तूच प्राण तू ध्यास,
तूच सार्थ तू अर्थ.....

फक्त आणि फक्त,
तूच माझं सर्वस्व.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १२/०१/२०१५...
रात्री १०:१७...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


किशोरी

  • Guest
Re: फक्त तूच...!!
« Reply #1 on: January 20, 2015, 02:28:15 AM »
तूच ताक तूच लोणी
तूच रवी तूच बरणी

तूच भाजी तूच आमटी
तूच दिसते गोरीगोमटी

तूच मांजराचे पिल्लू
झालो तुझ्यास्तव मीच उल्लू

इत्यादी.

-- के. शिवकुमार (झेंडूची फुले, भाग २)