Author Topic: तु म्हणजे ...!!  (Read 1626 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
तु म्हणजे ...!!
« on: April 06, 2015, 06:44:47 PM »
तु म्हणजे ...!!
---------

तु म्हणजे  ...
खांद्यावर ठेवून डोक
उर करावा रिकामा
माझ्या जीवाचा विसावा !!

तु म्हणजे ...
धगधगत्या  ऊन्हात
थंडगार असा गारवा
माझ्या प्रेमाचा ओलावा !!

तु म्हणजे ...
मायेची ऊब अशी
प्रेमाचा नितळ झरा
माझ्या ह्रदयाचा थंडावा !!

तु म्हणजे ...
तृप्तीची ढेकर अशी
जग सार फिक
तुझ्या रूपाचा भुलवा !!

.
.
.
.
           कवि-डी
           स्वलिखीत
           दि.06.04.2015
           वेळ सायंकाळी  06.40

Marathi Kavita : मराठी कविता