Author Topic: पोरा तुला बघण्यासाठी ...!!  (Read 916 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
पोरा तुला बघण्यासाठी ...!!
-------------------

म्या काय म्हातार बुडूक
आज हाय तर उद्या नाय
जीव माझा घुटमळतोय
पोरा तुला बघण्यासाठी ...!!

सत्ता नकू ना प्रारपटी
बंगला नकू ना गाडी
पैका तुझा बक्कळ येतो
त्वांड तुझं त्यात दिसतं? ...!!

विलायतीला तुझं राहणं
कामात तुझं बिझी असणं
यासाठीच तुला केल मोठं ?
माझ्या नसीबी झुरत मरणं ...!!

आता तरी तु परत ये
म्हाताऱ्याला जवळ घे
जीव माझा अडकलाय
पोरा तुला बघण्यासाठी ...!!
.
.
.
.
.
.
             कवि-डी
            स्वलिखीत
            दि.09.04.2015
            वेळ सकाळी 11:32