Author Topic: बापाचं काळीज लागतं ...!!  (Read 980 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
बापाचं काळीज लागतं ...!!
« on: April 12, 2015, 06:48:27 PM »
बापाचं काळीज लागतं ...!!
------------------

पोराला शहाणं होण्यासाठी
बापाला येड व्हावं लागतं
बाप म्हणजे काय असतं
कळायला बाप व्हाव लागतं ...!!

पोरानं जरी घातल्या लाथा
पचवायची ताकत  लागते
का भिजतात पापण्या डोळ्याच्या
कळायला बाप व्हाव लागतं ...!!

लागल काही पोराला जरी
बापाचं काळीज रडतं असतं
खचतंच का उभा राहतो
कळायला बाप व्हाव लागतं ...!!
.
.
.
.
          कवि-डी
          स्वलिखीत
          दि.11.04.2015
           वेळ संध्याकाळी.  06.42

Marathi Kavita : मराठी कविता