Author Topic: चार भिंती माझ्या ...!!  (Read 698 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
चार भिंती माझ्या ...!!
« on: April 17, 2015, 11:24:20 AM »
चार  भिंती  माझ्या...!!
---------------

चार भिंती माझ्या
आहेत सखेसोबती
रोज खेळती माझ्यासंगे
डाव लपाछपी...!!

आसु अन् सुखाच्या
सोबती त्या  भिंती
निराशा अन् आनंदाच्या
साक्षी त्या भिंती...!!

घराच्या  माझ्या 
आसरा या भिंती
नात्याच्या माझ्या
पहारा  या  भिंती...!!

जीवाच्या  माझ्या
मैत्रिणी या भिंती
कुरवाळती कधी
जवळ घेती भिंती...!!

सतत वाटतो घोर
वियोग तुझा होईल
मेल्यावरही  जीव
भिंतीमध्ये  राहील...!!
.
.
.
.
.
       कवि-डी
      स्वलिखीत
      दि.17.04.2015
      वेळ सकाळी 11:20

Marathi Kavita : मराठी कविता