Author Topic: तू फुलराणी...!!  (Read 1066 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

 • Jr. Member
 • **
 • Posts: 229
 • Gender: Male
 • कवी प्रकाश साळवी
तू फुलराणी...!!
« on: April 24, 2015, 09:13:44 PM »
तू फुलराणी...!!
या फुलांचे गंध घे तू
तू गंधाने न्हाऊन जा
घे बालकांचे हास्य तू
हास्यात तू हरवून जा
होऊन फूलांची बाग तू
सडे आनंदाचे शिंपीत जा
रंग घे तू फुलपाखरांचे
विश्वास तू रंगवून जा
पंख लेऊन पाखरांचे
या नभांती विहरून जा
घेऊन साथ तू चांदण्याची
शांत शितल होऊन जा
मंद स्मित हास्यातून
संदेश शितलतेचा देत जा
श्री.प्रकाश साळवी
दि.24-04-2015.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: तू फुलराणी...!!
« Reply #1 on: April 26, 2015, 12:37:56 PM »
घेऊन साथ तू चांदण्याची
शांत शितल होऊन जा
मंद स्मित हास्यातून
संदेश शितलतेचा देत जा
khup chhan prakash da...!

Offline श्री. प्रकाश साळवी

 • Jr. Member
 • **
 • Posts: 229
 • Gender: Male
 • कवी प्रकाश साळवी
Re: तू फुलराणी...!!
« Reply #2 on: April 26, 2015, 06:46:37 PM »
आभारी आहे मयुरजी कोणाला तरी आनंद मिळाला की खूप बरे वाटते त्यातच मला देखील आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद मित्रा.

प्रकाश साळवी.