तुझं प्रेम!!
फुलासारखं कोमल, काट्यासारखं बोचक,.. तुझं प्रेम,
दुभंगते मन, तरीही मनमोहक,... तुझं प्रेम,
सर्पासारखा डंख देतो, प्रत्येक क्षण तुझ्याविना
दुख:दायी भासते जीवन, तुझ्याविना
मनावरचा घाव आणि त्यावरची फुंकर,.... तुझं प्रेम,
रुक्ष वाळवंतात मृगजल सुन्दर,... तुझं प्रेम,
तुझ्या स्पर्शाने मोहरून जावसं वाटतं
त्याच धुंदीत मग हरवून जावसं वाटतं
चातकाची प्रतीक्षा आणि पहिला पाउस, ... तुझं प्रेम,
एक किनारा भरकटलेल्या तारुस,... तुझं प्रेम!!
- जय