ॐ साईं.
पुन्हा गुलामू दे...!! चारुदत्त अघोर(२२/५/११)
फक्त थेब थेंब आयुष्य मिळतंय,
जरा आयुष्य,जगू दे,
जीवनाच्या प्रवाही वाहतो आहे;
जरा प्रवाही वाहू दे;
एक एक क्षण,ठेव म्हणून साठवतोय,
जरा ते क्षण साठवू दे,
गेले मागले पळ,आठवतोय,
जरा ते पळ, आठवू दे...
भिजल्या भावनांनी ओलावतोय,
जरा त्या भावनां ओलावू दे..
कधी टोचंर्या जखमी सोलावतोय,
जरा त्या जखमा, परत सोलावू दे...
एकदा कधी तू,आकाश खुलवलेलं,
जरा ते आकाश, पुन्हा खुलवू दे...
माझ्या नंग्या पावली,फक्त होती तप्त जमीन,
जरा ती जमीन,आज जमिनू दे...
तुला फक्त आवडायची,सुकली पानगळ,
जरा ती पानं,आज पानगळू दे,...
तू सुगंधायाची,ओलि माती मळ,
ती माती, पुन्हा हाथी मळू दे..
मला नाकी, ओलि मेंदी वासायची,
ती मेंदी जरा, वासवू दे...
तुझी वाट पाहण्यास किती वेळ तासावायाची,
ती वेळ पुन्हा तासावू दे...
उत्सुक माझ्या हास्याला,नेहेमी आसवायाची,
जरा आज पुन्हा,आसवू दे..
शिगेला पोहचल्या आधणी,उतवून नासावयाची,
जरा उतावून, परत नासवू दे...
मिटल्या डोळी स्वप्नावर,पाउल पाडायची,
जरा पाउल परत पडावू दे..
मी जाताना मला दारी आडवायची,
जरा तूच ती, पुन्हा आडवू दे..
मिटल्या पापणी,ओलावून निरोपायाची,
आज मला जरा,निरोपू दे..
त्रास देवून मलाच,वरपांगी आरोपायाची,
त्याच गुन्ह्यात, जरा एकदा आरोपु दे....
कधी माझ्या काव्य पंक्तीस,वाकून सलामायची,
जरा त्या आठवणीत,मला सालामू दे...
कधी हक्कावून,मला गुलामायाची,
जरा त्या गोड हक्की,पुन्हा गुलामू दे...!!
चारुदत्त अघोर(२२/५/११)