एकटीच होती ती रस्त्याने
ईतक्यात सुरु झाला
पाऊस मंद मंद
भिजली ती पण
नाही आठवलो
मी...!!
सुळ सुळणारा पाउस
बरसु लागला सुगंध
तीच्या अत्तराचा बहरुण आला
पण नाहि आठवलो
मी..!!
झाले पाणी चोहुकडे
खळखळुण वाहुलागले
नदि नाले गालावर तीच्या
स्मीत हास्य बहरुण
आले
पण नाही आठवलो
मी..!!
फार दिवसानी बरसला
हर्षला भेटुण धरणीला
आतुरला होता जसा भेटायला
बघुन त्यांचे वेडे प्रेम
मनातुनच बहरली ती
पण नाही आठवलो
मी..!!
होता सुरु मंद मंद
पण झाला मुसळधार
तोच कडाडली वीज
चमकदार आणि बघुण
रौद्र रुप फार घाबरली
ती पण नाही आठवलो
मी...!!
तेवढ्यात दिसले झाड
चिंचेचे आणि बसली
झाडाखाली कमी होण्याच्या आशेने
पण नाही आठवलो
मी..!!
कारण होता तीच्या जवळ
तीचा तो आणि तोच
.......रेनकोट
तो घालुन परतीच्या वाटेने निघाली ती
कदाचीत म्हणुनच
नाहि आठवलो
मी..!!
_GANESH JAWARE