Author Topic: !... कॅण्डल डिनर ...!  (Read 1062 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
!... कॅण्डल डिनर ...!
« on: February 13, 2013, 10:36:35 PM »
!... कॅण्डल डिनर ...!

.....................................

आज प्रपोज करायचंय तुला

ठरवूनच टाकलंय मी

आज मनातलं सांगायचय

या प्रेमाच्या दिवशी ...........

सभोवताली काळोख

अन मेणबत्तीचा मंद प्रकाश

हातात हात घेईन

तुझा मी सावकाश

तो गंध अत्तराचा मनात असेलं दरवळत

मी मात्र तुझ्याकडे असेलं एकटक बघतं

तुझ्या संपूर्ण चेहऱ्यावर एक अदृश्य बुरखा

मी देईन टाकून

झाकलेल्या चेहऱ्यात बोलेन तुझ्यासवे

फक्त नजर भिडवून

तुझ्या डोळ्यांकडे वेड्यासारखं पाहीन मी

मनातले भाव अबोल राहिलेले वाचेन मी

त्या धुंद वातावरणात बेधुंद होऊन जावू

नको अडथळा म्हणून एकदाच ऑर्डर देवू

मी आणलेलं मोरपीस

हलकेच तुझ्या गालावर फिरवेल

त्या स्पर्शान तुझं रोम रोम शहारेल

शहारल्यान अंगावर काटे उभे राहतील

मी बघताच ते काटेही लाजतील

एकमेकात हरवलेले असतांना

मी देईन तुला एक लाल गुलाब

या गुलाबाच्या पाकळ्य़ासम

मी तुला जपत राहीन

काटे सगळे माझ्या तळहातावर झेलीन

नाही जगू शकत तुझ्या प्रेमाशिवाय

एवढंच मी बोलीन

मला विश्वास आहे मी आणलेलं गुलाब

माझ्या हातानं तू केसात माळून घेशील

मी आहे रे तुझीच

फक्त एक स्मित हास्य करून मला सांगशील .                                                           संजय एम निकुंभ , वसई

                                                               दि . ०९.०२.१३

 

 

Marathi Kavita : मराठी कविता